मुख्य मजकुरावर जा

Young Men बद्दल बायबलमधील वचने

347 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.

  2. माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ, आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस.

  3. त्यांचे उपदेश तू सतत आपल्या हृदयात बाळग; ते तुझ्या गळ्यात बांधून ठेव.

  4. तू चालशील, तेव्हा ते तुला मार्ग दाखवेल; तू झोपशील, तेव्हा ते तुझे संरक्षण करतील; आणि तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलतील.

  5. कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत.

  6. ते तुला तुझ्या शेजार्‍याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.

  7. तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.

  8. कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, परंतु दुसर्‍या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.

  9. मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले, तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय?

  10. मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास त्याचे पाय पोळणार नाहीत काय?

  11. तो असा मनुष्य आहे जो दुसर्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो; तिला स्पर्श करणार्‍या कोणाही मनुष्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.

  12. भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो, त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत.

  13. तरीही जर तो चोर सापडला जातो, तर त्याला सातपट भरपाई करावी लागते, त्याला त्याच्या घरातील सर्व संपत्ती विकावी लागते.

  14. परंतु जो मनुष्य जारकर्म करतो त्याच्याकडे समज नसते; जो कोणी तसे करतो तो स्वतःचाच नाश करतो.

  15. त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही.

  16. कारण मत्सर नवर्‍यास संतप्त करतो आणि जेव्हा तो सूड घेतो, तेव्हा तो दयामाया दाखविणार नाही.

  17. तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही; कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल.

  18. माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव.

  19. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर.

  20. तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव.

  21. “तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला, आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण.

  22. म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील, वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील.

  23. माझ्या घराच्या खिडकीच्या जाळीतून मी खाली पाहिले.

  24. साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला.

  25. तो तिच्या रस्त्याच्या कोपर्‍याजवळून जात होता, सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता.