मुख्य मजकुरावर जा

Tribe Of Ephraim बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझ्या जिवावर उदार होऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आलात?”

  2. मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.”

  3. त्याच्यानंतर पिराथोन येथील हिल्लेलचा मुलगा अब्दोनाने इस्राएलचे नेतृत्व केले.

  4. त्याला चाळीस पुत्र आणि तीस नातू होते, ते सत्तर गाढवांवर स्वार होते. त्याने आठ वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  5. मग हिल्लेलचा पुत्र अब्दोन मरण पावला आणि त्याला अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात एफ्राईममधील पिराथोन येथे पुरण्यात आले.

  6. आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.

  7. तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.

  8. आहाजाला सांग, ‘सावध राहा, शांत राहा आणि घाबरू नकोस. जळाऊ लाकडाच्या या दोन धुरकट थोटकामुळे अंतःकरण खचून देऊ नको—रसीन आणि अराम आणि रमाल्याहच्या पुत्राच्या भयंकर रागामुळे अंतःकरण खचू देऊ नको.

  9. अराम, एफ्राईम आणि रमाल्याहच्या पुत्राने असे म्हणून तुमच्या नाशाचा कट रचला आहे,

  10. “चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.”

  11. तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तसे होणार नाही, तसे घडणार नाही,

  12. कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.

  13. एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”

  14. पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले,

  15. “याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.”

  16. परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.”

  17. तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का?

  18. म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.

  19. जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल,

  20. कारण त्या मुलाला अयोग्य नाकारणे आणि योग्य निवडणे हे पुरेसे माहीत होण्याआधीच, ज्या दोन देशाच्या राजांची तुम्हाला भीती वाटत आहे ते नष्ट केले जातील.

  21. एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”