Skip to content

Tradition बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात;

  2. आणि हेच मनुष्याला अशुद्ध करतात. परंतु हात धुतल्याशिवाय अन्न खाल्याने ते अशुद्ध होत नाहीत.”

  3. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत.

  4. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.

  5. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?”

  6. त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत.

  7. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’

  8. तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”

  9. आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे!

  10. एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य गव्हाची काही कणसे तोडून हातांवर चोळून दाणे खाऊ लागले.

  11. ते पाहून परूशी म्हणाले, “तुम्ही शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते का करता?”

  12. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  13. दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  14. मग येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”

  15. दुसर्‍या एका शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये ते शिक्षण देत असताना, उजवा हात वाळून गेलेला असा एक मनुष्य तिथे उपस्थित होता.

  16. नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी लोक, त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण शोधत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात की काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते.

  17. परंतु येशूंना माहीत होते की ते काय विचार करीत आहेत, तेव्हा त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा.” तेव्हा तो उठला आणि तिथे उभा राहिला.

  18. नंतर येशू म्हणाले, “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, एखाद्याचा जीव वाचवणे किंवा त्याचा नाश करणे?”

  19. त्यांनी जमलेल्यांकडे आपली नजर फिरविली आणि नंतर ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.

  20. परंतु परूश्यांना व नियमशास्त्र शिक्षकांना क्रोध आला आणि येशूंना जिवे कसे मारता येईल याची त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा सुरू केली.

  21. सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत.

  22. हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि ऐहिक तत्वांवर आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा.

  23. बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा.

  24. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा.

  25. Neither give heed to fables and endless genealogies, which minister questions, rather than godly edifying which is in faith: so do.