Skip to content

Tradition बद्दल बायबलमधील वचने: Commandments of men

33 वचने · 3 पैलू

Commandments of men बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.

  2. जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”

  3. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  4. तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.

  5. किंवा, मंदिरात सेवा करीत असलेले याजक शब्बाथ दिवशी काम करून शब्बाथ विटाळवितात तरी ते निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय?

  6. मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे.

  7. ‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता.

  8. कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”

  9. “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!”

  10. येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता?

  11. परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’

  12. परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे.

  13. अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.

  14. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत.

  15. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.

  16. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?”

  17. त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत.

  18. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’

  19. तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”

  20. आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे!

  21. एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य गव्हाची काही कणसे तोडून हातांवर चोळून दाणे खाऊ लागले.

  22. ते पाहून परूशी म्हणाले, “तुम्ही शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते का करता?”

  23. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  24. दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  25. मग येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”