Skip to content

The Palm Tree बद्दल बायबलमधील वचने

19 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

  2. पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.

  3. नेगेव प्रांत व यार्देनेचे खोरे! आणि खजुरीच्या झाडांचे यरीहो शहर, सोअर प्रांतापर्यंत.

  4. मोशेच्या सासर्‍याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.

  5. तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.

  6. मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या भिंतीवर सभोवार करूब, खजुरीची झाडे व उमललेली फुले कोरली होती.

  7. त्यातील जैतून लाकडाच्या दोन दारांवर सोन्याचे ठोकलेले करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली.

  8. त्यावरही त्याने एकसारखे ठोकलेल्या सोन्याचे काम करून करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली.

  9. मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते.

  10. आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला.

  11. देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”

  12. नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;

  13. वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.

  14. तू खजुरीच्या झाडासारखी सडपातळ आहेस. खजुरीच्या घोसासारखे तुझे स्तन आहेत.

  15. मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन आणि त्याच्या घोसांना धरीन; तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत, आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो,

  16. ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”

  17. द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.

  18. त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”

  19. यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.