Skip to content

Deborah

9 वचने · 1 कुटुंब सदस्य

Deborah चा उल्लेख असलेली वचने

  1. त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व करत होती.

  2. तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.

  3. दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली.

  4. बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली.

  5. तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, “जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?” तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला.

  6. त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:

  7. इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत; मी, दबोरा उठेपर्यंत ते थांबले, मी, इस्राएलमधील एक माता उठेपर्यंत ते थांबले.

  8. ‘दबोरा जागी हो, जागी हो! जागी हो, जागी हो, तुझ्या मुखातून गीत भरभरून वाहो! ऊठ, हे बाराका! हे अबीनोअमाच्या पुत्रा, तू बंधनात टाकलेल्या बंदिवानांना घेऊन जा.’

  9. इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्‍यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.