- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Levites बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यांचे कूळ व घराणे यानुसार ते 2,630 होते.
सभामंडपात सेवा करणार्या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.
मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.
सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,
त्यांच्या कुळानुसार ते 3,200 गणले गेले.
सभामंडपात सेवा करणार्या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.
मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.
सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,
त्यांची संख्या 8,580 भरली.
याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आपले काम व त्यांनी काय वाहून न्यावे हे नेमून देण्यात आले. अशाप्रकारे याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाची गणती करण्यात आली.
इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे.
इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे.
आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.
लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले
आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते.
ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”
जेव्हा मोशेने हे ऐकले, तेव्हा तो पालथा पडला.
मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.
तर कोरहा, तू आणि तुझ्या सर्व अनुयायांनी असे करावे: धुपाटणे घ्या
आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!”
मोशे कोरहाला हे सुद्धा म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो आता ऐका!
तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय?
त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता.
तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”
मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही!