मुख्य मजकुरावर जा

The Levites बद्दल बायबलमधील वचने

255 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.

  2. “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”

  3. याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले,

  4. “कोहाथी गोत्राच्या कुळाचा लेव्यांमधून नाश होऊ नये,

  5. आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे.

  6. परंतु कोहाथी लोकांनी पवित्र वस्तू पाहण्यासाठी एक क्षणभरही आत जाऊ नये. नाहीतर ते मरण पावतील.”

  7. याहवेह मोशेला म्हणाले,

  8. गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.

  9. म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी.

  10. “वाहून नेणे व त्यांची इतर कामे करणे, ही गेर्षोनी कुळांची सेवा आहे:

  11. त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा.

  12. निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्‍या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्‍यात.

  13. गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.

  14. सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.

  15. “मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी.

  16. म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती करावी.

  17. सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या,

  18. त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्‍या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी.

  19. अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”

  20. मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्‍यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  21. सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

  22. त्यांची संख्या कुळांनुसार 2,750 होती.

  23. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  24. गेर्षोनी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  25. सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,