Skip to content

Tapestry बद्दल बायबलमधील वचने

47 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.

  2. प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.

  3. आणि दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.

  4. “अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.

  5. अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.

  6. सर्व कुशल कारागिरांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार केला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.

  7. सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.

  8. त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले.

  9. जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर त्यांनी निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनविले आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच केले.

  10. तसेच त्यांनी एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत तसेच पन्नास फासे केले, हे फासे समोरासमोर होते.

  11. मग त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे तयार केले आणि त्याचा उपयोग पडद्याच्या दोन जोड्या एकत्र बांधण्यासाठी केला, यासाठी की निवासमंडप अखंड होईल.

  12. निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते.

  13. सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.

  14. त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले.

  15. जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला.

  16. मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला.

  17. त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले.

  18. याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.

  19. सजावटीचे पडदे पांढर्‍या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्‍या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती.

  20. मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.

  21. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.

  22. अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी.