Skip to content

Shepherds बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 24 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’

  2. ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत; त्यांची तृप्ती कधीही होत नाही. ते असमंजस मेंढपाळ आहेत; ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात, केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात.

  3. मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील; ते तिच्या नगराभोवती त्यांचे तंबू ठोकतील, प्रत्येक कळपासाठी कुरणे विभागतील.”

  4. त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

  5. पश्चिमेकडील डोंगरातील गावात व तळवटीत, व नेगेवच्या गावात, बिन्यामीन प्रांतात, यरुशलेमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि यहूदीयाच्या सर्व नगरात, मोजणाऱ्यांच्या हाताखालून पुन्हा त्यांचे कळप जातील,’ असे याहवेह म्हणतात.

  6. “यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”

  7. “माझे लोक हरवलेली मेंढरे होती; त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले.

  8. “मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय?

  9. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी मेंढपाळांविरुद्ध आहे आणि माझ्या कळपाचा जाब त्यांच्यापासून घेईन. माझा कळप राखण्याचे काम मी त्यांच्यापासून काढून घेईन, म्हणजे मेंढपाळ पुन्हा स्वतःस पोसणार नाही. त्यांच्या तोंडातून मी माझ्या कळपाची सुटका करेन आणि यापुढे ते त्यांचा आहार होणार नाही.

  10. मेंढपाळ जेव्हा आपल्या मेंढरांमध्ये राहून पांगलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तसेच मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. ढगाळ व अंधकाराच्या दिवसात ते पांगून गेले त्या सर्व ठिकाणातून मी त्यांना सोडवेन.

  11. राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन.

  12. मी त्यांना उत्तम कुरणात पाळीन आणि इस्राएलच्या डोंगरांचे माथे त्यांची चरण्याची ठिकाणे होतील. तिथे ते चांगल्या कुरणात बसतील आणि तिथे इस्राएलच्या डोंगरांवर सर्वोत्तम कुरणात चरतील.

  13. मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  14. जे हरवले आहेत त्यांचा शोध मी करेन आणि भटकून गेलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्यांची पट्टी करेन आणि दुबळ्यांना शक्ती देईन, परंतु पुष्ट व बलवानांना मी नष्ट करेन. मी कळपाला न्यायाने पाळीन.

  15. मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल.

  16. याहवेह असे म्हणतात: “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, तसे शोमरोनातील इस्राएल लोक जे पलंगाच्या शीरपट्टीने आणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”

  17. तेव्हा मी कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा, विशेषतः कळपात अत्याचार होत असलेल्या मेंढरांचा मेंढपाळ झालो. मग मी मेंढपाळांच्या दोन काठ्या घेतल्या, एकीला मी कृपा व दुसरीला ऐक्य असे नाव दिले आणि मेंढरांचे राखण केले.

  18. आणि एका महिन्यातच मी तीन मेंढपाळांना काढून टाकले. परंतु त्या मेंढरांना माझी घृणा आली, त्यामुळे मी त्रागलो,

  19. मग याहवेहने मला सांगितले, “परत जाऊन मूर्ख मेंढपाळाची अवजारे घे.

  20. मी या राष्ट्रास एका अशा मेंढपाळाच्या हाती देईन, जो हरविलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही, कोकरांकडे लक्ष देणार नाही, जखमी मेंढरांना औषध देणार नाही किंवा सशक्त मेंढरांना चारा देणार नाही. त्याऐवजी तो पुष्ट मेंढरे खाऊन टाकील व त्यांची खुरे विदारून त्याचे तुकडे करेल.

  21. “धिक्कार असो अशा कुचकामी मेंढपाळाला, जो कळपाला सोडून पळून जातो! तलवार त्याचा हात कापून व उजवा डोळा फोडून टाको! त्याचा हात पूर्णपणे निकामी होवो, आणि त्याचा उजवा डोळा पूर्णपणे अंध होवो!”

  22. “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”

  23. आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते.

  24. हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”

  25. त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला: