Shepherds बद्दल बायबलमधील वचने: Seeking out good pasture for them
Seeking out good pasture for them बद्दल वचने
ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्यापर्यंत गेले.
तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत.
ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.
ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.