Skip to content

Seekers बद्दल बायबलमधील वचने

165 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  2. याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  3. सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  4. तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.”

  5. आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.”

  6. “त्या समयी, त्या दिवसात इस्राएलचे लोक आणि यहूदीयाचे लोक एकत्र येतील, आणि अश्रू गाळीत त्यांचे परमेश्वर याहवेहचा शोध घेतील, याहवेह जाहीर करतात.

  7. जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.

  8. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.

  9. आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:

  10. “पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही.

  11. पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्याच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जी नीतिमान कृत्ये त्याने केली आहे त्यामुळे तो खचितच जगेल.

  12. दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  13. तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  14. त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील.

  15. ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”

  16. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  17. तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या.

  18. तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.

  19. याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.

  20. बेथेलचा शोध करू नका, गिलगाल येथे जाऊ नका, किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”

  21. याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल, नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील; आणि त्याला भस्म करून टाकील, आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल.

  22. ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— याहवेह, हे त्यांचे नाव आहे.

  23. वाईट नको, तर चांगले ते शोधा, म्हणजे तुम्ही जगाल. तुम्ही जसे ते म्हणतात त्याचप्रमाणे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर तुमच्यासोबत असतील.

  24. आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाही.

  25. या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.