Skip to content

Seekers बद्दल बायबलमधील वचने

165 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला

  2. मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.

  3. माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत, कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील.

  4. मी याहवेहला एक याचना केली, हीच माझी आकांक्षा आहे: मी आयुष्यभर याहवेहच्या भवनात वस्ती करावी जेणेकरून मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या मंदिरात ध्यान करावे.

  5. तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.

  6. याहवेहची प्रतीक्षा कर; हिंमत बांध, धैर्य धर; आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.

  7. आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.

  8. कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.

  9. तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील, परंतु याहवेहचा शोध घेणार्‍यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.

  10. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.

  11. निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.

  12. त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.

  13. जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्‍यांच्या वार्‍यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.

  14. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील. हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.

  15. माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?

  16. रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”

  17. या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.

  18. यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.

  19. तुमचे सामर्थ्य आणि गौरव मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.

  20. कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील.

  21. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.

  22. उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्‍या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.

  23. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  24. कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.

  25. मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.