मुख्य मजकुरावर जा

Sanitation बद्दल बायबलमधील वचने

289 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पंजांवर चालणारा प्रत्येक प्राणी खाण्यास तुम्हाला मनाई आहे. अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

  2. जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा.

  3. जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे,

  4. घोरपड, घुशी, पाल, मगर, गोगलगाय व गुहिर्‍या सरडा.

  5. जमिनीवर सरपटणार्‍यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

  6. त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल.

  7. त्यापैकी एखादा प्राणी मातीच्या पात्रात पडला, तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.

  8. अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे.

  9. अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा.

  10. जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्‍यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे.

  11. जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते;

  12. पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  13. तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  14. त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  15. जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत. ते खाऊ नयेत.

  16. जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत.

  17. झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका.

  18. “पशू, पक्षी, प्रत्येक जलचर आणि प्रत्येक प्राणी जे जमिनीवर सरपटणारे आहेत त्यांच्यासंबंधी हे नियम आहेत.

  19. शुद्ध व अशुद्ध प्राणी तुम्ही खावे वा खाऊ नये यामधील फरक दाखविण्यासाठी हे नियम आहेत.”

  20. “इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी.

  21. आठव्या दिवशी तिच्या पुत्राची सुंता करावी.

  22. नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्‍या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये.

  23. जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.”

  24. “जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र यापैकी एकाकडे आणावे.

  25. याजकाने त्या व्यक्तीच्या त्वचेवरील चट्टा तपासावा आणि चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील व तो त्वचेपेक्षा खोल गेलेला असेल, तर हा कुष्ठरोग समजावा; आणि याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी केल्यावर, त्याला विधिनियमानुसार अशुद्ध म्हणून जाहीर करावे.