मुख्य मजकुरावर जा

Sanitation बद्दल बायबलमधील वचने

289 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल

  2. तर याजकाने त्याची तपासणी करावी. चट्टा त्वचेखाली खोलवर आहे असे वाटत असेल आणि चट्ट्यावर पिवळे केस सापडले असतील, तर याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे; हा डोक्याचा अथवा हनुवटीचा कुष्ठरोग आहे.

  3. पण तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नाही आणि त्यामध्ये काळे केस नाहीत, असे याजकाच्या तपासणीत दिसून आले तर याजकाने त्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे.

  4. सातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील,

  5. तर व्रणाभोवतीचे केस काढून टाकावे; व्रणावरचे केस मात्र काढू नयेत. मग याजकाने त्या व्यक्तीला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.

  6. मग याजकाने सातव्या दिवशी तपासणी करावी, आणि व्रण त्वचेवर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेखाली खोलवर गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध म्हणून जाहीर करावे आणि ती व्यक्ती कपडे धुतल्यानंतर शुद्ध व्हावी.

  7. पण तो शुद्ध जाहीर केल्यानंतर तो चट्टा पसरू लागला,

  8. तर याजकाने तपासणी करावी आणि चट्ट्याभोवतालचे केस पिवळे होतात की नाही याची वाट न पाहता, ती व्यक्ती अशुद्ध असे जाहीर करावे.

  9. पण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे.

  10. एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर पांढरे चट्टे असतील,

  11. तर याजक तपासणी करेल आणि त्वचेवरील चट्ट्याचा रंग पांढरट असेल, तर इसब हा चर्मरोग झाला आहे, असे जाहीर करेल; ती व्यक्ती शुद्ध आहे.

  12. कोणा माणसाच्या डोक्यावरील केस गळून टक्कल झाले असेल तर तो शुद्ध आहे.

  13. जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय.

  14. तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे.

  15. याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल,

  16. तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे.

  17. असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे.

  18. जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.

  19. एखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे,

  20. सुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला

  21. आणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी.

  22. याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.

  23. And he shall look on the plague on the seventh day: if the plague be spread in the garment, either in the warp, or in the woof, or in a skin, or in any work that is made of skin; the plague is a fretting leprosy; it is unclean.

  24. तेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी.

  25. पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी.