मुख्य मजकुरावर जा

Sanitation बद्दल बायबलमधील वचने

289 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे.

  2. सातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.

  3. सातव्या दिवशी, याजकाने त्याची पुन्हा तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला आहे व तो त्वचेवर पसरला नसेल, तर तो शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे; कारण तो साधारण खवंद होय. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत आणि पूर्ववत शुद्ध व्हावे.

  4. परंतु याजकापुढे शुद्ध सिद्ध झाल्यावर, तो चट्टा त्वचेवर पसरू लागला, तर त्या व्यक्तीने स्वतःला पुन्हा याजकासमोर हजर करावे.

  5. याजकाने त्या व्यक्तीची तपासणी करावी आणि खवंद त्वचेवर पसरलेला दिसून आल्यास, त्याला अशुद्ध असे जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.

  6. “एखाद्या मनुष्याला कुष्ठरोग झाला असेल, तर त्याला याजकाकडे न्यावे.

  7. याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास,

  8. तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.”

  9. जर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर,

  10. याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.

  11. परंतु त्यांच्यावर उघडी जखम आढळल्यास, ते अशुद्ध समजावे.

  12. याजकाने त्वचेवरील जखम पाहून त्या व्यक्तीला अशुद्ध जाहीर करावे; त्वचा नसलेले मांस अशुद्ध असून ते कुष्ठरोग आहे; हा गंभीर आजार आहे.

  13. परंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे.

  14. याजकाने त्यांना तपासावे, जर तो भाग खरोखर पूर्णपणे पांढरा झालेला असेल, तर तो मनुष्य शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे.

  15. ज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला

  16. व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे.

  17. याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे.

  18. पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.

  19. त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे.

  20. पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.

  21. एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले,

  22. तर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे.

  23. पण तपासणीनंतर त्या पांढर्‍या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे;

  24. सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.

  25. पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही.