मुख्य मजकुरावर जा

Sanitation बद्दल बायबलमधील वचने

289 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  2. ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  3. “जे प्राणी फक्त रवंथ करतात किंवा त्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, ते तुम्ही खाऊ नयेत. उंट जरी रवंथ करतात तरी त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  4. रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.

  5. ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.

  6. डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत.

  7. त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  8. “समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.

  9. पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत.

  10. तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये.

  11. ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे.

  12. “जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड,

  13. लाल पतंग, कोणत्याही जातीचे काळे पतंग,

  14. कोणत्याही जातीचे कावळे,

  15. शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,

  16. लहान घुबड, करढोक, मोठे घुबड,

  17. पांढरे घुबड, वाळवंटी घुबड, कुरर,

  18. करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.”

  19. चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात.

  20. तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता.

  21. उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत.

  22. मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत.

  23. वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  24. जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.

  25. ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल.