Skip to content

Reprobacy बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमचा नाश होईपर्यंत याहवेह तुम्हावर प्रत्येक आजार आणि सर्व साथींचे रोग आणि या नियमशास्त्र ग्रंथात ज्यांचा उल्लेख नाही, असे सर्व रोग तुम्हावर आणतील.

  2. तुम्ही आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित असला, तरी अगदीच थोडके उराल, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आज्ञापालन केले नाही.

  3. तुमची भरभराट करण्यात व तुम्हाला बहुगुणित करण्यात जसा याहवेहला आनंद वाटला, तसाच आनंद त्यांना तुमचा नाश व नायनाट करण्यातही वाटेल. जो देश तुम्ही ताब्यात घेण्यास जात आहात, त्या देशातून तुमचे उच्चाटन करण्यात येईल.

  4. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.

  5. त्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला स्वास्थ्य मिळणार नाही, तुमच्या पायांना विसावा मिळणार नाही, तिथे तुमची हृदये थरथर कापत राहतील, तुमचे डोळे म्लान होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल, असे याहवेह करतील.

  6. तुम्ही सदैव संशयात जगाल, रात्रंदिवस तुम्ही भीतीने ग्रस्त राहाल, तुमच्या जीवनाची काहीच खात्री राहणार नाही.

  7. तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!”

  8. जो प्रवास तुम्ही कधीही करणार नाही असे याहवेह म्हणाले होते, तोच प्रवास याहवेह तुम्हाला करावयाला लावतील आणि जहाजातून मी तुम्हाला पुन्हा इजिप्त देशामध्ये पाठवेन. मग तिथे तुमच्या शत्रूंनी तुम्हाला पुरुष व स्त्री गुलाम म्हणून विकत घ्यावे यासाठी तुम्ही स्वतःला देऊ कराल, परंतु तुम्हाला कोणाही विकत घेणार नाही.

  9. आणि म्हणून त्या दिवशी माझा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकेल आणि मी त्यांचा त्याग करेन; माझे मुख त्यांच्यापासून लपवेन आणि त्यांचा नाश होईल. त्यांच्यावर भयंकर संकटे व अरिष्ट येतील आणि त्या दिवशी ते म्हणतील, ‘आमचे परमेश्वर आता आम्हामध्ये नाहीत म्हणून ही संकटे आम्हावर आली आहेत का?’

  10. आणि निश्चितच इतर दैवतांची उपासना करण्याच्या त्यांच्या पातकांमुळे मी माझे मुख त्यांच्यापासून लपवेन.

  11. परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही; इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.

  12. म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले, ते स्वतःची इच्छापूर्ती करत राहिले.

  13. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  14. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  15. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  16. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  17. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  18. ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’

  19. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”

  20. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.

  21. परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”

  22. सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  23. म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.

  24. सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.

  25. याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.