Skip to content

Reprobacy बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्‍या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”

  2. किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”

  3. तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.”

  4. ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत, कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.”

  5. “म्हणून या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, किंवा यांच्यासाठी माझ्याकडे विनंती किंवा विनवण्या करू नकोस. कारण मी तुझे ऐकणार नाही.

  6. तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!

  7. जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन याहवेहच्या शोधात फिरतील, ते त्यांना सापडणार नाही; कारण त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहेत.

  8. त्यांच्याविषयी यशायाह संदेष्ट्याची ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.

  9. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’

  10. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”

  11. मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’

  12. “त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्‍यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’

  13. “त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.

  14. “काही वेळाने त्या दुसर्‍याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’

  15. “पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’

  16. “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.

  17. परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”

  18. “अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळजण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत.

  19. एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’ “तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’

  20. “पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’

  21. “त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्‍यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’

  22. “अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल.

  23. कारण ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना भोजनातले काहीही चाखावयास मिळणार नाही.’ ”

  24. परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत.

  25. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत जे नाव तुम्ही मला दिले, त्याद्वारे मी त्यांना राखले व सुरक्षित ठेवले आणि जो नाशाचा पुत्र आहे त्याच्याशिवाय एकाचाही नाश झाला नाही, यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.