मुख्य मजकुरावर जा

Reprobacy बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला,

  2. जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.

  3. जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

  4. परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते, ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आहे; तिचा अंत जळण्याने होईल.

  5. सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही,

  6. पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच.

  7. मोशेने दिलेले नियमशास्त्र एखाद्याने नाकारले तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.

  8. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?

  9. कारण “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे.

  10. जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे.

  11. परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.

  12. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठत्वाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या.

  13. तुम्हाला माहीत आहे की, त्यानंतर तो हा ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असतानाही त्याचा नकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी जे काही त्याने केले होते ते त्याला बदलता आले नाही.

  14. ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.

  15. ज्यांच्यासाठी दंडाज्ञा फार पूर्वीच लिहून ठेवलेली होती असे काही लोक गुप्तपणे तुमच्यामध्ये आत शिरले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपल्या एकाच सार्वभौम प्रभूला नाकारतात.

  16. जरी हे सर्व तुम्हाला आधी माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभूने त्यांच्या लोकांना इजिप्तमधून सोडविले, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा त्यांनी नाश केला.

  17. आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

  18. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

  19. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.

  20. परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”

  21. तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील.

  22. त्यांना धिक्कार असो! त्यांनी काईनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.

  23. हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्‍याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत.

  24. ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्‍या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्‍यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.

  25. अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.”