मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने

726 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग सभा संपल्यावर अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले व त्यांच्याबरोबर बोलणे केले. त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे असे पौल आणि बर्णबाने त्यांना उत्तेजन दिले.

  2. पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले.

  3. परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.

  4. मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरिता तुम्ही स्वतः योग्य नाहीत असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो.

  5. यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”

  6. गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभूच्या वचनाचा सन्मान केला व आणि ज्यांना सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त करण्यात आले होते त्या सर्वांनी विश्वास ठेवला.

  7. प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले.

  8. परंतु यहूदी पुढार्‍यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले.

  9. तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले.

  10. आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.

  11. इकुन्या येथे पौल व बर्णबा नेहमीप्रमाणे यहूदी सभागृहामध्ये गेले. तिथे ते इतक्या प्रभावीपणाने बोलले की, यहूदी व गैरयहूदी लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला.

  12. परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांनी इतर गैरयहूद्यांना चिथावणी देऊन बंधुवर्गाविरुद्ध त्यांची मने विषाने भरली.

  13. तरी देखील पौल व बर्णबाने तिथे बराच काळ घालविला, ते धैर्याने प्रभूसाठी बोलत राहिले, त्यांनी कृपेचा संदेश चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे सिद्ध केला.

  14. मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले.

  15. त्यांना अन्यायाने धोंडमार करण्यासाठी गैरयहूदी, यहूदी, व त्यांचे पुढारी मिळून कट करीत होते.

  16. हे त्यांना समजल्यावर ते लुकाओनियानच्या प्रांतातील लुस्त्र, दर्बे व सभोवतालच्या देशामध्ये पळून गेले,

  17. आणि तिथे शुभवार्तेचा प्रचार करीत राहिले.

  18. त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता.

  19. पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले.

  20. तेव्हा त्याने मोठ्याने म्हटले, “तुझ्या पायांवर उठून उभा राहा!” त्याच क्षणाला त्या मनुष्याने उडी मारली आणि तो चालू लागला.

  21. पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!”

  22. बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले.

  23. शहराच्या बाहेर असलेल्या झूस मंदिरातील पुजार्‍याने, बैल आणि फुलांच्या माळा घेतल्या व शहराच्या वेशीजवळ आले, कारण त्याला आणि जनसमुदायाला, त्यांना यज्ञार्पणे करावयाची होती.

  24. परंतु ज्यावेळी प्रेषित बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी स्वतःची वस्त्रे फाडली व धावत लोकांमध्ये शिरून ते ओरडून म्हणाले:

  25. “मित्रांनो, तुम्ही हे कशासाठी करीत आहात? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्ही तुमच्यासाठी जी शुभवार्ता आणली आहे ती तुम्हाला सांगतो, यासाठी की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून देऊन, ज्याने आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळावे.