Skip to content

Reaping बद्दल बायबलमधील वचने

44 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  2. पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे,

  3. तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही.

  4. तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्‍यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ”

  5. गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत.

  6. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल.

  7. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.

  8. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.

  9. मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.

  10. अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.”

  11. आता कापणार्‍याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्‍याने व कापणार्‍यानेही एकत्रित मिळून आनंद करावा.

  12. जिथे तुम्ही पेरणी केली नाही, तिथे कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले; इतरांनी पेरणी करण्याचे कष्ट केले होते आणि त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ तुम्हाला मिळाले आहे.”

  13. जर आम्ही तुमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीचे बीज पेरले आणि त्याबद्दल केवळ भौतिक गोष्टींच्या हंगामाची अपेक्षा केली, तर त्यात काय मोठे झाले?

  14. जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

  15. योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.

  16. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  17. मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता.

  18. मग मंदिरातून एक देवदूत बाहेर आला व मेघावर बसलेल्यास उच्चस्वराने हाक मारून म्हणाला, “तुमचा विळा घ्या आणि कापणीस प्रारंभ करा, कारण पृथ्वीचे पीक तयार झाले आहे व कापणी करण्याची वेळ आली आहे.”

  19. तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.