Skip to content

Reaping बद्दल बायबलमधील वचने

44 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.”

  2. “ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये.

  3. “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी जो देश तुम्हाला देणार आहे, जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश कराल आणि पिकांची कापणी कराल, तेव्हा तुम्ही कापणी केलेल्या पहिल्या धान्याची एक पेंढी याजकाकडे आणावी.

  4. “ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्‍या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  5. आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील.

  6. पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.

  7. उभ्या पिकाला विळा लावल्यापासून तुम्ही सात आठवडे मोजावे.

  8. आपल्या शेजार्‍याच्या उभ्या पिकात तुम्ही गेलात, तर हवी तेवढी कणसे तुम्ही हाताने मोडून खावी, पण त्याच्या उभ्या पिकास मात्र विळा लावू नये.

  9. त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”

  10. बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?”

  11. त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे.

  12. तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा.

  13. ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.”

  14. भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते.

  15. यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.

  16. पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्‍यांसोबत होता.

  17. मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.

  18. ते रानातून चारा गोळा करतात आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात.

  19. जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.

  20. जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

  21. कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.

  22. जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.

  23. जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल.

  24. माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”

  25. “ते वारा पेरतात आणि ते वावटळीची कापणी करतात. त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; त्यातून पीठ तयार होत नाही. जर त्यातून अन्न तयार झाले तर परकीय ते गिळून टाकतील.