Skip to content

Proverbs बद्दल बायबलमधील वचने: Miscellany of

22 वचने · 3 पैलू

Miscellany of बद्दल वचने

  1. तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?”

  2. जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.

  3. “इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा?

  4. तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!

  5. ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे.

  6. इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्‍याने शस्त्र उतरविणार्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ ”

  7. जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!

  8. “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि मुलांचे दात आंबले.’

  9. “मानवपुत्रा, इस्राएल देशात ही काय म्हण आहे: ‘दिवस निघून जातात आणि प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे’?

  10. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, या म्हणीचा मी शेवट करणार आहे आणि ते इस्राएलमध्ये पुन्हा तिचा उच्चार करणार नाहीत.’ त्यांना सांग, ‘प्रत्येक दृष्टान्ताची पूर्तता होण्याचे दिवस जवळ येत आहेत.

  11. “ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.”

  12. “याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही इस्राएल देशात ही म्हण वापरता: “ ‘आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि लेकरांचे दात आंबले’?

  13. “सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ यापुढे तुम्ही इस्राएलमध्ये या म्हणीचा उपयोग करणार नाही.

  14. कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील.

  15. आणि असे होईल की: जसे लोक तसे याजक होतील. मी दोघांनाही त्यांच्या आचरणामुळे शासन करेन आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना परतफेड करेन.

  16. “जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.

  17. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मला ही म्हण लागू कराल: अरे ‘वैद्या, तू स्वतःलाच बरे कर!’ आणि तुम्ही मला म्हणाल, ‘ज्याकाही गोष्टी तुम्ही कफर्णहूम या गावात केल्या त्याविषयी आम्ही ऐकले आहे, त्या गोष्टी येथे स्वतःच्या गावात करा.’ ”

  18. प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते. लोक काटेरी झुडूपावरून अंजीर काढीत नाहीत किंवा काटेरी झुडूपावरून द्राक्षे काढीत नाहीत.

  19. “मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला, तर त्याचा खारटपणा कशाने परत आणाल?

  20. त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?” यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.”

  21. तुम्ही फसविले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.”

  22. फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो!