- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Preaching बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
कारण मी असा निश्चय केला होता की तुम्हामध्ये असताना फक्त क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी जाणून घेऊ नये.
मी तुमच्याकडे अशक्त, अतिशय भीतभीत व कापत आलो.
माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.
यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.
तरी देखील, आम्ही परिपक्व झालेल्यांना ज्ञानाचा संदेश सांगतो, परंतु हे ज्ञान या युगाचे नव्हे किंवा या युगाचे शासक, ज्यांचे अधःपतन होणार आहे त्यांचेही नव्हे.
आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे.
तरी या युगाच्या अधिकार्यांना ही योजना समजलीच नाही, त्यांना ती समजली असती, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रूसावर कधीच खिळले नसते.
आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे.
आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.
प्रीतीचा मार्ग अनुसरा, तरीपण आत्म्याच्या देणग्यांची इच्छा बाळगत राहा, विशेषतः संदेश सांगण्याचे.
कारण जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलता तेव्हा माणसाशी नव्हे तर परमेश्वराशी बोलता. निश्चित, तुम्ही आत्म्याद्वारे गूढ बोलत असाल तर तुमचे बोलणे कोणालाही समजणार नाही.
परंतु जो कोणी संदेश देतो तो लोकांची आत्मिक वृद्धी, प्रोत्साहन, आणि समाधान व्हावे म्हणून बोलतो.
जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःचीच उन्नती करतो. परंतु जो संदेश देतो, तो मंडळीची प्रगती करण्यास मदत करतो.
तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही संदेश देणारे व्हावे. कारण अन्य भाषा बोलण्यार्यांनी अर्थ नाही सांगितला तर मंडळीची उन्नती कशी होईल, पण त्यापेक्षा संदेश देणारे अधिक श्रेष्ठ आहेत.
बंधू व भगिनींनो, समजा मी तुमच्याकडे आलो आणि अन्य भाषेत बोलू लागलो, तर तुम्हाला माझा काय फायदा, याउलट मी तुमच्यासाठी काही प्रकटीकरण, किंवा ज्ञान किंवा संदेश दिला किंवा वचनाचा बोध आणला तर चांगले होणार नाही का?
बासरी किंवा वीणा यांसारख्या निर्जीव वस्तू ध्वनी उत्पन्न करतात, परंतु प्रत्येक वाद्याच्या स्वरात भिन्नता असल्याशिवाय कोणते वाद्य वाजत आहे हे कसे समजणार?
जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?
तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्याबरोबर बोलत आहात असे होईल.
निःसंशय जगामध्ये निरनिराळ्या भाषा आहेत, परंतु एकही अर्थाविना नाही.
जर मला एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नाही, तर माझ्याशी बोलणारा मनुष्य मला विदेशी वाटेल आणि मीही त्याला विदेशी वाटेन.
तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा.
या कारणासाठी एखादा अन्य भाषेत बोलतो, तर त्याने आपण काय बोललो याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
कारण मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझे मन निष्फळ आहे.
मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन.
जेव्हा तुम्ही फक्त आत्म्याने परमेश्वराची उपकारस्तुती कराल, तर जो चौकशी करणारा किंवा अविश्वासू व्यक्ती, ज्याला तुम्ही काय बोलता हे समजत नाही तो तुमच्या स्तुतीला “आमेन” कसा म्हणू शकेल?