Preaching बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.”
याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?
आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.”
लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.
यरुशलेम येथील दावीद राजाचा पुत्र, उपदेशकाची वचने:
मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो.
लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तिथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले.
त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.
कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.
योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले.
ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”
ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला.
नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.
त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले.
यानंतर येशूंनी एका शहरातून दुसर्या शहरात आणि गावोगावी प्रवास करीत परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा केली. त्यांचे बारा शिष्य त्यांच्याबरोबर होते,
त्यावेळी येशू पवित्र आत्म्याद्वारे आनंदित होऊन म्हणाले, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्यांपासून या गोष्टी गुप्त ठेवल्या आणि लहान बालकांना प्रगट केल्या, म्हणून मी तुमचे आभार मानतो कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.
त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, “या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत.”
कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे.
क्रूसाचा संदेश नाश पावत असलेल्यांना मूर्खपणाचा वाटतो, तरी तारणाची प्राप्ती होत आहे अशा आपल्यासाठी तो परमेश्वराचे सामर्थ्य असा आहे.
कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.
पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे,
तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बल गोष्टी निवडल्या.
परमेश्वराने जगातील धिक्कारलेले, अकुलीन यांना निवडले, जेणे करून त्यांना शून्यवत करावे.
आणि म्हणूनच परमेश्वरासमोर कोणत्याही मनुष्याने बढाई मारू नये.
बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्याबाबतीत तसेच झाले, जेव्हा मी तुम्हाकडे आलो, तेव्हा परमेश्वराची साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मानवी ज्ञान आणि वक्तृत्व घेऊन आलो नाही.