Skip to content

Preaching बद्दल बायबलमधील वचने

86 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्यातील प्रत्येकाशी आमचे वागणे पवित्र, नीतीने व निर्दोष होते, याला तुम्ही विश्वासणारे स्वतः आणि परमेश्वर साक्षी आहेत.

  2. पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे,

  3. तुम्हाला उत्तेजन, सांत्वन आणि विनंती करून सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या गौरवी राज्यात बोलाविले आहे, त्यांना शोभेल असे जीवन जगा.

  4. हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.

  5. कित्येक ती स्वीकारून विश्वासापासून ढळले आहेत. परमेश्वराची कृपा तुझ्याबरोबर असो.

  6. तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.

  7. भक्तिहीन वादविवाद टाळा, कारण जे त्यात गुंततात ते अधिकाधिक भक्तिहीन होतील.

  8. आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्‍या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.

  9. मी तुला सांगितलेल्या या सर्वगोष्टी सत्य आहेत आणि या गोष्टींवर विशेष भर देऊन तू त्या सांगाव्या अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी सत्कार्य करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी उत्कृष्ट असून प्रत्येकाला लाभदायक आहेत.

  10. परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ्या व वादविवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहे.

  11. त्यांनी प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेश देणारा नोआहचे सात जणांसह रक्षण केले.