Skip to content

Polygamy बद्दल बायबलमधील वचने

26 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर तो दुसर्‍या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये.

  2. “ ‘तुझी पत्नी जिवंत असताना तिची वैरीण म्हणून तिच्या बहिणीशी विवाह करू नकोस आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका.

  3. तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये.

  4. एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल,

  5. तर जेव्हा तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा जो खरा ज्येष्ठपुत्र असून नावडत्या पत्नीचा पुत्र आहे, त्याला डावलून, धाकट्या पुत्राला, जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे, त्याला आपल्या प्रथम पुत्राचा अधिकार देऊ नये.

  6. आपल्या परंपरेप्रमाणे त्याने आपल्या सर्वात ज्येष्ठ पुत्राला दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. तो जरी नावडत्या पत्नीचा पुत्र असला, तरीही ज्येष्ठ पुत्राचा हक्क त्याचाच आहे.

  7. त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते.

  8. तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते.

  9. यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या.

  10. त्या दिवसात सात स्त्रिया एका पुरुषास धरून असे म्हणतील “आम्ही स्वतःचे अन्न मिळवू आणि स्वतःचे वस्त्र मिळवू; आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!”

  11. मग याहवेह मला म्हणाले, “जा आणि आपल्या पत्नीस आपली प्रीती पुनः प्रकट कर, जरी तिला दुसरा कोणता पुरुष प्रीती करतो आणि ती एक व्यभिचारिणी आहे. जरी ते इतर दैवतांकडे वळले असून पवित्र मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी याहवेह इस्राएली लोकांवर प्रीती करतात.”

  12. तेव्हा मी तिच्या सुटकेसाठी चांदीची पंधरा शेकेल व एक होमेर व एक लेथेक जव देऊन तिला विकत घेतले.

  13. तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला.

  14. तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका.

  15. येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’

  16. आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’

  17. काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”

  18. त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?”

  19. ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.”

  20. येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले.

  21. परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले.

  22. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील,

  23. आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत.

  24. तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.

  25. सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा.