Skip to content

Peace बद्दल बायबलमधील वचने: Social

48 वचने · 38 पैलू

Social बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!”

  2. “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.

  3. कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल, आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील.

  4. तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील; तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही.

  5. वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.

  6. जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.

  7. मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

  8. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,

  9. दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो.

  10. तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे.

  11. जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात.

  12. कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.

  13. भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.

  14. कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.

  15. अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे.

  16. ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  17. मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

  18. ज्या खास्द्यांच्या नगरात तुम्हाला बंदिवान म्हणून नेण्यात आले आहे तिथे शांतता आणि समृद्धी नांदावी म्हणून प्रयत्न करा. खास्द्यांसाठी याहवेहकडे प्रार्थना करा, कारण तिथे समृद्धी आल्यास तुम्हासही समृद्धी लाभेल.”

  19. त्या दिवशी मी त्यांच्यासाठी रानातील पशू, आकाशातील पक्षी आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. धनुष्य आणि तलवार आणि लढाया मी देशातून काढून टाकेन, म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.

  20. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”

  21. धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील.

  22. “भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.

  23. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल.

  24. “मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालविण्यास आलो आहे.

  25. “ ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे.