Skip to content

Passover बद्दल बायबलमधील वचने

161 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. व सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा.

  2. आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा.

  3. ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत.

  4. अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत.

  5. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.

  6. अवीव हा महिना पाळावा आणि याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी वल्हांडण सण साजरा करावा, कारण त्यांनी अवीव महिन्यात तुम्हाला इजिप्त देशामधून रात्रीच्या वेळी बाहेर काढले.

  7. याहवेह तुमच्या परमेश्वराला तुमचे वल्हांडण सणाचे अर्पण म्हणजे शेरडेमेंढरे किंवा गाईबैल असावे आणि याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथे त्याचे अर्पण करावे.

  8. ते खमीर असलेल्या भाकरीबरोबर खाऊ नये, परंतु सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी, ही तुमच्या क्लेशाची भाकर होय, कारण इजिप्त देश घाईघाईने सोडताना तुम्हाला खावी लागली होती—इजिप्तमधून तुमची सुटका झाली त्या वेळेची आठवण तुम्हाला आयुष्यभर राहील.

  9. सात दिवसापर्यंत तुमच्या संपूर्ण देशात खमीर अजिबात दृष्टीस पडू नये. बली देण्यात आलेले मांस दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत राहू देऊ नये.

  10. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही वल्हांडणाच्या यज्ञपशूचे अर्पण करावयाचे नाही,

  11. तर ते आपल्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथेच वल्हांडणाचा यज्ञपशू तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी अर्पावा, कारण त्याच वेळेला तुम्ही इजिप्त देशामधून बाहेर पडला होता.

  12. याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या स्थानी ते भाजावे आणि खावे. मग दुसर्‍या दिवशी सकाळी आपल्या तंबूत परतावे.

  13. तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये.

  14. वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर हजर व्हावे: बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण व मंडपांचा सण. या प्रत्येक प्रसंगी याहवेहसमोर रिक्तहस्ते येऊ नये:

  15. राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा.

  16. नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते.

  17. ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले.

  18. जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला.

  19. ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा.

  20. इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा.

  21. “तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा.

  22. वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.”

  23. योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले.

  24. त्याच्या अधिकार्‍यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्‍याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली.

  25. तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली.