Passover बद्दल बायबलमधील वचने: Reinstituted by Ezekiel
Reinstituted by Ezekiel बद्दल वचने
“ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडण सण पाळावा, तो सण सात दिवसांचा असावा, त्यात तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.
त्या दिवशी राजपुत्राने स्वतःसाठी व देशातील सर्व लोकांच्या पापार्पणासाठी एक गोर्हा द्यावा.
सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे.
धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन जैतुनाचे तेल आणावे.