Passover बद्दल बायबलमधील वचने: Lamb killed by Levites, for those who were ceremonially unclean
Lamb killed by Levites, for those who were ceremonially unclean बद्दल वचने
जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला.
ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा.
इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा.
“तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा.
वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.”
योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले.
त्याच्या अधिकार्यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली.
तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली.
सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले.
वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली.
तोपर्यंत याजक आणि लेवी यांनी विधीनियमाप्रमाणे स्वतःला शुद्ध करून घेतले होते. लेव्यांनी वल्हांडण सणाच्या अर्पणासाठी बंदिवासातून परत आलेल्या लोकांसाठी आणि याजकांसाठी व स्वतःसाठी वल्हांडणाची मेंढरे वधली.