Skip to content

Minister (2) बद्दल बायबलमधील वचने

16 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”

  2. मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.”

  3. फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली.

  4. फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले.

  5. फारोहने योसेफास म्हटले, “मी इजिप्त देशाचा राजा फारोह आहे, पण संपूर्ण इजिप्त देशभर तुझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा हात किंवा पाय उचलणार नाही.”

  6. आणि याईरचा वंशज ईरा दावीदाचा याजक होता.

  7. नाथानचा पुत्र अजर्‍याह, हा राज्याधिकार्‍यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता;

  8. अहीथोफेल राजाचा सल्लागार होता. हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता.

  9. “याहवेह संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर मुख्य याजक अमर्‍याह तुमच्यावर असेल आणि राजाच्या संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर यहूदीयाच्या वंशाचा प्रमुख इश्माएलचा मुलगा जबद्याह तुमच्यावर असेल आणि लेवी तुमच्यापुढे अधिकारी म्हणून काम करतील. धैर्याने वागा आणि जे चांगले काम करतात त्यांच्याबरोबर याहवेह असतील.”

  10. एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले.

  11. त्यानंतर अहश्वेरोश राजाने अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा बहुमान करून त्याची इतर प्रतिष्ठितांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणून नेमणूक केली.

  12. खुद्द अहश्वेरोश राजाच्या खालोखाल मर्दखयचे पद होते. अर्थात्, तो यहूदी लोकांमध्ये अतिशय थोर होता आणि त्याचे सर्व देशबांधव त्याचा फार आदर करीत, कारण तो आपल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खूप झटत असे व त्यांच्या हितासाठी रदबदली करीत असे.

  13. मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.

  14. दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे,

  15. व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा.

  16. दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती.