Millennium बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
“कारण पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही.
परंतु मी जी निर्मिती करेन त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा. कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.
मी यरुशलेमसाठी आनंद करेन आणि माझे लोक मला आनंददायी होतील; यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी कधीही कानांवर पडणार नाही.
“यापुढे तान्ही बाळे कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत. आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल; यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल; जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास तो शापित समजल्या जाईल.
त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील.
त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील, किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही, कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल, तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील; माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ सुखाने बहुतकाळ उपभोगतील.
त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत. कारण ते लोक आणि त्यांचे वंशज याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील.
मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन.
लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” असे याहवेह म्हणतात.
त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस, त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही, तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस. कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन. माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही गर्विष्ठपणा केला जाणार नाही.
मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन, असेच अवशिष्ट लोक ठेवेन. इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते याहवेहच्या नामात आश्रय घेतील.
इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत; ते असत्य बोलणार नाहीत. लबाडी करणारी जीभ त्यांच्या मुखात असणार नाही. ते अन्न सेवन करून विसावा घेतील आणि त्यांना कोणीही भीती दाखविणार नाही.”
सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.
मग ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केले त्या सर्व राष्ट्रातून वाचलेले अवशिष्ट लोक प्रत्येक वर्षी वर यरुशलेमला राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची भक्ती करण्यास, मंडपाचा सण पाळण्यास व आराधना करण्यास जातील.
आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.
जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात.
म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल.
त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्यांसारखी होतील.
यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी नसतील.
आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारेन; तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचा विजय होणार नाही.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन; पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,