Gog
Gog चा उल्लेख असलेली वचने
“मानवपुत्रा, मागोग देशाचा रोष, जो मेशेख व तूबाल यांचा राजपुत्र आहे त्याच्याकडे आपले मुख कर व त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर
आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख व तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.
“यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय?
मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.
त्या दिवशी असे होईल: जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, तेव्हा माझा तापलेला क्रोध भडकेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
“मानवपुत्रा, गोगविरुद्ध भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख आणि तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.
“ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्यांच्या खोर्यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे खोरे म्हटले जाईल.
आणि तो पृथ्वीच्या चार कोपर्यातील गोग व मागोग राष्ट्रांस ठकविण्यास व त्यांना लढाईसाठी एकत्र करण्यास बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्र किनार्यावरील वाळूच्या कणांइतकी आहे.