Skip to content

Merchant बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.

  2. मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.

  3. याशिवाय व्यापारी आणि सावकार, अरब देशाचे राजे व देशाच्या राज्यपालांपासून येणारी महसूल ती वेगळीच होती.

  4. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असत.

  5. व्यापारी आणि सावकार यांच्यापासून येणारा महसूलचा यात समावेश नाही. तसेच अरब देशाचे सर्व राजे आणि शासनाच्या अंतर्गत प्रदेशाचे राज्यपाल शलोमोनासाठी सोने आणि चांदी आणत होते.

  6. इतर सोनारांनी आणि व्यापार्‍यांनी त्या कोपर्‍यापासून मेंढेवेशीपर्यंत कोटाची डागडुजी केली.

  7. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.

  8. विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?

  9. हा धुराच्या स्तंभासारखे व्यापाऱ्यांच्या सर्व सुगंधित पदार्थांनी, ऊद आणि गंधरस यांनी सुगंधित, असा रानातून हा कोण येत आहे?

  10. तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा.

  11. ते तुझ्यासाठी एवढेच करतील की— ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास, आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस, ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील; आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही.

  12. त्याने त्यावरील अगदी वरचा कोंब तोडला, तो व्यापार्‍यांच्या देशात नेला आणि तिथे विक्रेत्यांच्या शहरात लावला.

  13. “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.

  14. “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.

  15. “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

  16. “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.

  17. “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.

  18. तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

  19. “ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.

  20. तुझ्या वल्हेकर्‍यांनी तुला खोल समुद्रात आणले. परंतु त्या खोल समुद्रामध्ये पूर्वेकडील वारा तुझे तुकडे करेल.

  21. तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.

  22. जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.

  23. सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्‍यावर उभे राहतील.

  24. आपला आवाज उंच करून तुझ्यासाठी हेल काढून रडतील; ते आपल्या डोक्यावर धूळ उडवतील व राखेत लोळतील.

  25. तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून गोणपाट नेसतील. ते आपल्या जिवाच्या आकांताने व अति शोकाने तुझ्यासाठी रडतील.