मुख्य मजकुरावर जा

Merchant बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता, ते तुझ्यासाठी विलापगीत गातील: “सोर, जी समुद्रात निःशब्द झाली, तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?”

  2. जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे, तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले; तुझ्या महान संपत्ती व मालाने पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस.

  3. आता तू समुद्राकडून पाण्याच्या खोलीमध्ये तुटून गेली आहेस; तुझा माल व तुझे साथीदार तुझ्याबरोबर खाली बुडले आहेत.

  4. समुद्रतटावर वसलेले तुला पाहून घाबरून जातात; त्यांचे राजे भीतीने कापतात आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत.

  5. राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात; तुझा भयंकर अंत झाला आहे आणि तुझे अस्तित्वच नाहीसे होणार आहे.’ ”

  6. शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’

  7. व्यापारी चुकीचे माप वापरतो आणि त्याला लबाडी करणे आवडते.

  8. तू तुझ्या व्यापार्‍यांची संख्या वाढविली आहे त्यांची संख्या आकाशातील तार्‍यांपेक्षाही जास्त वाढली आहे, परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात व मग ते उडून जातात.

  9. “पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे.

  10. तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”

  11. “पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही:

  12. दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.