Skip to content

Laban बद्दल बायबलमधील वचने: Outwitted by Jacob

28 वचने · 7 पैलू

Outwitted by Jacob बद्दल वचने

  1. मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.

  2. त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील.

  3. त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत.

  4. मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही.

  5. जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.

  6. पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत.

  7. याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली.

  8. याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.”

  9. आणि याकोबाला दिसून आले की लाबानची त्याच्याबद्दलची वृत्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही.

  10. तेव्हा याहवेह याकोबाशी बोलले आणि म्हणाले, “तू आता आपल्या वडिलांच्या व नातलगांच्या देशात परत जा आणि मी तुझ्याबरोबर असेन.”

  11. तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना ज्या शेतात तो कळप राखीत होता तिथे बोलावून घेतले.

  12. तो त्यांना म्हणाला, “मी पाहतो की तुमच्या वडिलांची वृत्ती माझ्याशी पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण माझ्या वडिलांचे परमेश्वर माझ्याबरोबर आहेत.

  13. मी तुमच्या वडिलांची आपल्या सर्व शक्तिनिशी सेवा केली हे तुम्हाला माहीत आहे;

  14. तरीपण तुमच्या वडिलांनी माझ्या वेतनाबाबत केलेला करार दहा वेळा बदलून मला फसविले आहे, तरी परमेश्वराने त्यांना माझे काही वाईट करू दिले नाही.

  15. कारण ज्यावेळी त्यांनी म्हटले की, डाग असलेल्या शेळ्यामेंढ्या तुझ्या, त्यावेळी सर्व कळपांना डाग असलेली करडे होत. जेव्हा ते आपले मन बदलून म्हणत, पट्टेदार शेळ्यामेंढ्या तुझ्या, तेव्हा त्यांना सर्व पट्टेदार करडे होत.

  16. अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत.

  17. “कळप फळावयाच्या ॠतूत मला स्वप्नात दिसले की, कळप फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत.

  18. मग स्वप्नामध्ये परमेश्वराच्या दूताने मला बोलावून म्हटले, ‘याकोबा,’ मी उत्तर दिले, ‘हा मी इथे आहे.’

  19. आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझी नजर वर कर आणि पाहा की, फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. कारण लाबानाने तुझ्याशी कसा व्यवहार केला हे सर्व मी पाहिले आहे.

  20. मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ”

  21. तेव्हा राहेल आणि लेआ यांनी उत्तर दिले, “आता आमच्या वडिलांच्या संपत्तीत आमचा काही वाटा राहिला आहे काय?

  22. ते आम्हाला परकियांसारखी वागणूक देत नाहीत काय? त्यांनी आम्हाला केवळ विकलेच नाही, तर आमच्याबद्दल मिळालेला सर्व मोबदला वापरून संपविला आहे.

  23. आमच्या वडिलांकडून परमेश्वराने हे धन काढून घेतले आहे, ते निश्चितच आमचे आणि आमच्या मुलाबाळांचे धन आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे तसे करा.”

  24. मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले

  25. आणि त्याने आपल्यापुढे कळप हाकीत, पद्दन-अराम येथे मिळालेली सर्व मालमत्ता घेऊन त्याचे वडील इसहाक याचा देश कनान इथे जाण्यास निघाला.