मुख्य मजकुरावर जा

Jonah बद्दल बायबलमधील वचने

50 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”

  2. मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

  3. मग याहवेहचे वचन दुसऱ्या वेळेस योनाहकडे आले:

  4. “ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.”

  5. तेव्हा योनाहने याहवेहच्या वचनाप्रमाणे केले आणि निनवेह शहरास गेला. आता निनवेह हे फारच मोठे शहर होते. ते पार करण्यास तीन दिवस लागत होते.

  6. जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.”

  7. तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.

  8. जेव्हा योनाहची चेतावणी निनवेहच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला, आपली राजवस्त्रे काढून बाजूला ठेवली व गोणपाट परिधान करून तो राखेत जाऊन बसला.

  9. त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली: “राजा आणि त्याच्या सरदारांच्या आदेशानुसार: “कोणत्याही मनुष्याने किंवा पशूने, गुरे किंवा मेंढरांनी, काहीही चाखू नये; त्यांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये.

  10. पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा.

  11. कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.”

  12. जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.

  13. परंतु योनाहला हे फार चुकीचे आहे असे वाटले आणि त्याला राग आला.

  14. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.

  15. तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.”

  16. परंतु याहवेहनी उत्तर दिले, “तुला राग येणे योग्य आहे का?”

  17. मग योनाह बाहेर गेला आणि शहराच्या पूर्वेकडे बसला. तिथे त्याने एक मंडप बांधून सावलीत बसला आणि तिथून शहराचे काय होते, याची वाट बघत बसला.

  18. मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला.

  19. पण दुसर्‍या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले.

  20. जेव्हा सूर्य उगवला तेव्हा परमेश्वराने पूर्वेचा एक प्रखर वारा पाठवला आणि योनाहच्या डोक्यावर सूर्याची उष्णता आदळली, ज्यामुळे तो मूर्छित झाला. त्याला मरावेसे वाटू लागले, आणि तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरण बरे.”

  21. तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.”

  22. परंतु याहवेह म्हणाले, “तू या रोपट्यासाठी चिंतित आहेस, ज्याची काळजी तू घेतली नाहीस किंवा वाढविले नाहीस. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली.

  23. मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”

  24. आपल्या भोवती लोकांची खूपच गर्दी वाढली हे पाहून येशू म्हणाले, “ही दुष्ट पिढी चिन्ह मागते पण योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे चिन्ह या पिढीला दिले जाणार नाही.

  25. कारण ज्याप्रमाणे योनाह निनवेहच्या लोकांना चिन्ह होता, तसेच मानवपुत्र या पिढीला चिन्ह असा होईल.