Skip to content

Instruction बद्दल बायबलमधील वचने

179 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे.

  2. मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन.

  3. मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत.

  4. तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन आणि मी लज्जित केला जाणार नाही.

  5. तुमच्या नियमात माझा आनंद आहे, कारण ते मला प्रिय आहेत.

  6. मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन, जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन.

  7. तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे;

  8. माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.

  9. गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात, तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही.

  10. याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते.

  11. संताप मला व्यापून टाकतो, कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत.

  12. मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत.

  13. हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो, जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन.

  14. तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे.

  15. याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात; तुमचे नियम पालन करण्याचे मी वचन दिले आहे.

  16. पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो; आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा.

  17. माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत.

  18. मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन.

  19. दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही, मी तुमचे नियम विसरणार नाही.

  20. मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन.

  21. माझी मैत्री त्या सर्वांशी आहे, जे तुमचे भय धरतात व तुमचे आज्ञापालन करतात.

  22. हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तुमचे नियम मला शिकवा.

  23. हे याहवेह, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे, तुमच्या सेवकाचे कल्याण करा.

  24. तुम्ही मला ज्ञान व विवेक शिकवा, कारण तुमच्या आज्ञांवर माझा पूर्ण विश्वास आहे.

  25. पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो.