मुख्य मजकुरावर जा

Instruction बद्दल बायबलमधील वचने

179 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्‍याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले.

  2. त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.

  3. त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले.

  4. मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन;

  5. ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे, त्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्या आहेत.

  6. आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.

  7. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली.

  8. जेणेकरून येणार्‍या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे.

  9. मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील.

  10. ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते.

  11. ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात.

  12. तुमचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, म्हणूनच ते तुम्ही योजलेले आहेत.

  13. अहा, तुमचे नियम पाळण्यास माझे आचरण नेहमी स्थिर असते तर किती बरे झाले असते!

  14. मी तुमचे नियम पाळले, तर माझी फजिती होणार नाही.

  15. जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन, तेव्हा सात्विक हृदयाने तुमचे उपकारस्मरण करेन.

  16. मी तुमच्या विधींचे पालन करेन; माझा पूर्णपणे त्याग करू नका.

  17. तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील? ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.

  18. तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे; त्या आज्ञेपासून मला बहकून जाऊ देऊ नका.

  19. मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.

  20. हे याहवेह, तुमचे स्तवन होवो; तुमचे विधी मला शिकवा.

  21. तुमच्या मुखातून निघालेले सर्व नियम आपल्या ओठांनी मी त्या सर्वांची पुनरुक्ती करतो.

  22. तुमच्या नियमांचे पालन करण्यात मला असा अत्यानंद होतो, जसा अमाप धनसंपत्ती मिळाल्यावर होतो.

  23. मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो.

  24. मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो; मी तुमच्या वचनांची उपेक्षा करणार नाही.

  25. मी जिवंत असेपर्यंत मला विपुल आशीर्वादित करा, म्हणजे मी तुमच्या वचनाचे पालन करीत राहीन.