मुख्य मजकुरावर जा

Homicide बद्दल बायबलमधील वचने

44 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.

  2. त्यावेळी याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला वतन म्हणून देत आहेत, त्यामधील तीन शहरे तुम्ही वेगळी करून ठेवावी.

  3. यातील अंतर निश्चित करा आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीचे तीन भाग करा, म्हणजे एखाद्याने कोणाची हत्या केली, तर त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी त्या नगरात पळून जाता येईल.

  4. जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्‍याचा वध केला.

  5. एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्‍याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्‍हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्‍याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.

  6. नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्‍याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.

  7. म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी.

  8. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तुमच्या देशाच्या सीमांचा विस्तार करून संपूर्ण देश तुम्हाला दिला,

  9. कारण मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती केली व त्यांच्या मार्गात आज्ञाधारकपणे चाललात—तर तुम्ही आणखी तीन शहरे निवडावीत.

  10. हे करावे, अशा रीतीने याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देत असलेल्या भूमीवर निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही.

  11. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले:

  12. “इस्राएली लोकांना सांग, मोशेद्वारे तुम्हाला सुचविल्यानुसार आश्रयाची शहरे नेमून द्यावीत.

  13. यासाठी की जर एखाद्याने अकस्मात् आणि अजाणतेने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याने तिथे पळून जावे आणि रक्ताचा सूड घेणार्‍यापासून आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.

  14. जेव्हा ते या शहरांपैकी एका शहराकडे पळून जातील, तेव्हा त्यांनी त्या शहराच्या वेशीवर उभे राहावे आणि आपली हकिकत त्या शहराच्या वडीलजनांना सांगावी. आणि त्या वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्यांच्या शहरात घ्यावे आणि त्यांच्यामध्ये राहण्यासाठी त्याला जागा द्यावी.

  15. जर रक्ताचा सूड घेणारा शोध करीत आला तर, वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे स्वाधीन करू नये, कारण त्याने आपल्या शेजार्‍याचा काही दुष्ट उद्देश नसताना वध केला आहे आणि त्याच्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती.

  16. जोपर्यंत तो सभेसमोर खटल्यासाठी उभा राहत नाही आणि त्यावेळेस तिथे सेवा करीत असलेला महायाजकास मृत्यू येईपर्यंत त्याने त्या शहरात राहावे. त्यानंतर तो व्यक्ती जिथून पळून आला, त्या नगरात स्वतःच्या घरी परत जावे.”

  17. तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली.

  18. यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.

  19. त्यांच्यामध्ये राहणारा कोणा इस्राएली किंवा परदेशीयाने नकळतपणे कोणाची हत्या केली असेल, तर त्याने या नेमून दिलेल्या शहरांकडे पळून जावे, यासाठी की मंडळीसमोर खटल्यासाठी उभे राहण्याआधी रक्ताचा सूड घेणार्‍याकडून तो मारला जाऊ नये.