मुख्य मजकुरावर जा

Homicide बद्दल बायबलमधील वचने: Distinguished from murder

6 वचने · 12 पैलू

Distinguished from murder बद्दल वचने

  1. “ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.

  2. किंवा कोणी दगड घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.

  3. किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.

  4. रक्ताचा सूड घेणार्‍याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्‍याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्‍याने खुनी मनुष्याला जिवे मारावे.

  5. जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले

  6. किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे.