- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Homicide बद्दल बायबलमधील वचने: Accidental
Accidental बद्दल वचने
“एखाद्या बैलाने एखाद्या पुरुष किंवा स्त्रीस हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलास धोंडमार करून ठार मारावे व त्याचे मांस खाऊ नये. परंतु बैलाचा मालक निर्दोष असून जबाबदार असणार नाही.
पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे.
परंतु जर त्याच्याकडून खंडणी मागितली असेल, तर जेवढी रक्कम मागितली ती देऊन तो मालक आपला जीव वाचवू शकतो.
एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला बैलाने हुंदडून मारले, तरी हाच नियम लागू व्हावा.
पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.
तुमच्यासाठी आश्रयनगरे व्हावी म्हणून तुम्ही काही शहरे निवडून ठेवा, म्हणजे कोणी एखाद्याला चुकून जिवे मारले तर त्याने तिथे पळून जावे.
सूड घेणार्यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये.
ही जी सहा नगरे तुम्ही द्याल ती तुमच्यासाठी आश्रयाची नगरे म्हणून असतील.
या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत.
ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे.
“ ‘पण काही शत्रुत्व नसताना अचानक कोणी एखाद्याला ढकलतो किंवा चुकीने त्यांच्यावर एखादी वस्तू फेकतो
किंवा न पाहताच त्यांना मारून टाकू शकेल असा जड दगड त्यांच्यावर टाकेल, व तो व्यक्ती जर मेला, परंतु ज्याने मारले तो त्याचा शत्रू नव्हता व त्याने ती हानी मुद्दाम केली नाही,
म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा.
खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंडळीने रक्ताचा सूड घेणार्यापासून वाचवावे व तो ज्या आश्रयाच्या नगराकडे पळून गेला होता त्याकडे त्याला पाठवावे. पवित्र तेलाने अभिषेक झालेल्या मुख्य याजकाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी मनुष्याने तिथेच राहावे.
“ ‘परंतु आरोपी ज्या आश्रय नगरात पळून गेला आहे त्याच्या सीमेबाहेर गेला
आणि रक्ताचा सूड घेणार्याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही.
कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे.
नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली;
ती यासाठी की, जर कोणी चुकून एखाद्या व्यक्तीची हत्या केली, त्याने पूर्व कल्पना नसताना एखाद्या शेजार्याला अनावधानाने मारले तर त्याला सुरक्षिततेसाठी त्या शहरात पळून जाता येईल. तो यापैकी एका शहरात पळून जाऊन आपला जीव वाचवू शकतो.
ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.
त्यावेळी याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला वतन म्हणून देत आहेत, त्यामधील तीन शहरे तुम्ही वेगळी करून ठेवावी.
यातील अंतर निश्चित करा आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीचे तीन भाग करा, म्हणजे एखाद्याने कोणाची हत्या केली, तर त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी त्या नगरात पळून जाता येईल.
जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्याचा वध केला.
एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.
नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.