मुख्य मजकुरावर जा

Gath बद्दल बायबलमधील वचने: David takes refuge at

12 वचने · 15 पैलू

David takes refuge at बद्दल वचने

  1. त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला.

  2. परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?”

  3. हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली.

  4. म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला.

  5. आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले?

  6. माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?”

  7. तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले.

  8. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या.

  9. जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही.

  10. नंतर दावीद आखीश राजास म्हणाला, “जर आपल्या दृष्टीत मी कृपा पावत असलो तर, मला देशातील एका गावात जागा द्या म्हणजे मी तिथे राहीन. आपल्या सेवकाने या राजकीय शहरात तुमच्याबरोबर का राहावे?”

  11. म्हणून आखीशने त्या दिवशी त्याला सिकलाग हे शहर दिले. आणि तेव्हापासून ते यहूदीयाच्या राजांचे आहे.

  12. दावीद पलिष्ट्यांच्या हद्दीमध्ये एक वर्ष चार महिने राहिला.