मुख्य मजकुरावर जा

Gath बद्दल बायबलमधील वचने: Band of Gittites, attached to David

5 वचने · 15 पैलू

Band of Gittites, attached to David बद्दल वचने

  1. त्याची सर्व माणसे करेथी आणि पलेथी व सर्व सहाशे गित्ती लोक जे दावीदाबरोबर गथवरून आले होते ते त्यांच्याबरोबर राजापुढे चालत होते.

  2. राजा गित्ती इत्तय याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येत आहे? परत जा आणि अबशालोम राजाबरोबर राहा. तू तर परदेशीय, तुझ्या जन्मभूमीतून बाहेर आलेला आहेस.

  3. तू कालचा आलेला मनुष्य, मी कुठे जातो ते मला स्वतःला माहीत नाही, तेव्हा मी तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे का फिरवू? परत जा आणि आपले लोक सोबत घेऊन जा. याहवेह तुला दया व विश्वासूपण दाखवो.”

  4. परंतु इत्तयने उत्तर दिले, “जिवंत याहवेहची आणि माझ्या राजाच्या जीविताची शपथ, माझे स्वामी कुठेही असतील, मग ते जीवन किंवा मरण असले तरी तिथे आपला सेवक असणार.”

  5. दावीद इत्तयला म्हणाला, “पुढे जा, चालत राहा.” तेव्हा गित्ती इत्तय पुढे चालत गेला. त्याची सर्व माणसे व त्याचे घराणे त्याच्याबरोबर होते.