मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, एवढेच नाही, तर त्याने आमच्यासाठी सभागृह ही बांधून दिले आहे.”

  2. म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. पण घरापासून फार दूर नव्हते तेव्हा शताधिपतीने आपल्या मित्रांच्या हाती निरोप पाठविला: “प्रभू, माझ्या छप्पराखाली येण्याचा आपण त्रास घेऊ नका कारण त्यासाठी मी योग्य नाही.

  3. आणि याकारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल.

  4. कारण मी स्वतः अधिकाऱ्याच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्याही अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे,’ कर अथवा, ‘ते,’ कर असे म्हटले तर तो ते करतो.”

  5. येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलींमध्ये सुद्धा दिसून आला नाही.”

  6. येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.”

  7. येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घराकडून एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”

  8. हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.”

  9. तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल चिंता करू नका.

  10. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय?

  11. कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात!

  12. शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?

  13. तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता?

  14. “रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  15. जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील!

  16. तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका.

  17. कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे.

  18. परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  19. “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.

  20. जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,

  21. जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.”

  22. कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

  23. त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.

  24. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.”

  25. आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.”