मुख्य मजकुरावर जा

Esau बद्दल बायबलमधील वचने

47 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.

  2. इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  3. बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

  4. योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

  5. हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  6. मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

  7. सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला.

  8. शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

  9. बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती.

  10. हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,

  11. ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

  12. केनाज, तेमान, मिब्सार,

  13. मग्दीएल व ईराम.

  14. याहवेह असे जाहीर करतात, “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय?

  15. तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल.

  16. तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे, तू लाजेने झाकून जाशील; आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल.

  17. अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली त्या दिवशी तू अलिप्त राहिला आणि परदेशी लोक त्याच्या वेशीत शिरले आणि यरुशलेमसाठी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा तू त्यांच्यापैकी एक होतास.

  18. आपल्या भावाच्या दुःखाच्या दिवशी त्याच्याबद्दल आनंद करू नकोस, किंवा यहूदीयाच्या रहिवाशांवर आनंद मानू नकोस, त्यांच्या संकटाच्या दिवशी अधिक गर्व करू नकोस.

  19. तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी माझ्या लोकांच्या नगरात प्रवेश करू नका, किंवा त्यांच्या आपत्तीच्या दिवशी त्यावर आनंद करू नका, किंवा त्यांच्या विपत्तीच्या दिवशी. त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवू नका.

  20. त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी चौकात उभा राहू नको किंवा त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांच्या शत्रूच्या स्वाधीन करू नको.

  21. याकोब अग्नीसारखा आणि योसेफ ज्वालासारखे असतील; एसाव उरलेल्या भुशासारखे होतील, आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील. एसावच्या वंशजांपैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” याहवेहने हे म्हटले आहे.

  22. एसावाचा पर्वत दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, आणि पलिष्टी लोकांच्या देशाला डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.