मुख्य मजकुरावर जा

Egyptians बद्दल बायबलमधील वचने

71 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्‍या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.

  2. ज्या दिवशी त्यांनी इजिप्तमध्ये आपली चिन्हे प्रदर्शित केली, सोअनाच्या प्रदेशात त्यांनी चमत्कार केले.

  3. त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रूपांतर रक्तात केले; त्यामुळे त्यांच्या जलप्रवाहातील पाणी पिता आले नाही.

  4. सर्व इजिप्त देश खाऊन टाकण्यासाठी त्यांनी कीटकांचे थवेच्या थवे पाठविले आणि बेडकांनी सर्व विध्वंस करून टाकले.

  5. त्यांनी त्यांची पिके सुरवंटांना खावयास दिली; त्यांचा हंगाम टोळांनी फस्त केला.

  6. त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला.

  7. त्यांनी त्यांची गुरे गारांनी नष्ट केली, विजेने त्यांची मेंढरे ठार झाली.

  8. त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला.

  9. त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.

  10. इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले; जे हामाच्या डेर्‍यातील पौरुषाचे प्रथमफळ होते.

  11. इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.

  12. त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

  13. “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.

  14. बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’

  15. “याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत!

  16. तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!”

  17. जेव्हा फारोहच्या सैन्यामुळे बाबेलच्या सैन्याने यरुशलेमहून माघार घेतली,

  18. उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.

  19. “ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन.

  20. बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल.

  21. ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही.