मुख्य मजकुरावर जा

Egyptians बद्दल बायबलमधील वचने: Aid the Israelites against the Chaldeans

7 वचने · 18 पैलू

Aid the Israelites against the Chaldeans बद्दल वचने

  1. इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.

  2. त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

  3. “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.

  4. बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’

  5. “याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत!

  6. तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!”

  7. जेव्हा फारोहच्या सैन्यामुळे बाबेलच्या सैन्याने यरुशलेमहून माघार घेतली,